April 4, 2025
अमरावती क्रीडा खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर मोताळा लोणार विदर्भ विविध लेख व्यापारी शेगांव संग्रामपूर सामाजिक

गरजुंना अन्नदान केल्याने परमानंदाची प्राप्ती होते – राधेश्याम चांडक

बुलडाणा: शासकीय रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची गरज लक्षात घेवून उस्फुर्तपणे काही सेवेकरी मंडळीनी दर गुरुवारी अन्नदान करण्याचे ठरविले आणि पाहता पाहता या उपक्रमाला दहा वर्ष पुर्ण होत आहे. वाढदिवसा निमित्त या गरजुंना अन्नदान करतांना मानसिक शांती व परमानंद प्राप्त होतो असे उदगार ४९२ व्या सप्ताहा निमित्त आयोजित अन्नदान वितरण करतांना राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी काढले. अन्नदान सुरु करण्याच्या प्रारंभी भाईजींनी संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्प वाहीले आणि भाईजींच्या हस्ते अन्नदानाला सुरुवात झाली. अन्नदान है श्रेष्ठदान आहे, रुग्णांच्या नातेवाईकांची हेळसांड लक्षात घेवून गजानन महाराज सेवा समितीने सुरेश गट्टाणी यांच्या संकल्पनेतुन अन्नदानाची योजना सुरु झाली. विजय वैद्य, रूपराव उज्जैनकर, श्री. वावगे, तिलोकचंद चांडक, प्रकाशचंद्र पाठक, शामराव खरे, पांडुरंग कव्हाळे, राजपूत (पोलीस), गोपालसिंग राजपूत, सचिन सुर्यवंशी, वाणी, वाघ, चव्हाण, सांगळे, चोपडे, कोलवडकर, राहुल, सईद ठेकेदार, सलीम, मिर्झा, बजरंग सोनी इत्यादी अनेक सेवेकरी प्रति गुरुवारी सेवा देतात, अशोक पांचाळ कॅटर्स ना नफा ना तोटा या तत्वावर अन्न पुरवठा करतात, मनोज राजूरे विनामुल्य आर.ओ. जलपान व्यवस्था करतात, प्रतिवर्षी भाईजी व डॉ. सुकेशजी झंवर वाढदिवसा निमित्त अन्नदान करतात आज भाईजी सोबत माहेश्वरी युवा मंचचे सर्वश्री उमेश मुंदडा, कमलेश चांडक, नितीन तापडीया, महेश टावरी, डॉ. पवन बजाज यांच्यासह मधुकर गायके, पंजाबराव ईलग इत्यादींनी सहकार्य केले. दोन महिन्यानंतर या उपक्रमाला ५०० आठवडे पुर्ण होत असुन या वेळी सर्व सेवेकरी मिळून हा अन्नदानाचा खर्च करणार आहे. अनेक मान्यवरांनी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे उद्गार काढले. आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, विजय अंभोरे या अनेक मान्यवर ह्यामध्ये सहकार्य करतात. वाढदिवस, पुण्यतिथी, जन्म, मृत्यु, लग्नाच्या वाढदिवसाचे निमित्याने अन्नदान करतात अश्या या उपक्रमास सढळ हाताने मदत करून अन्नदानाचे पुण्य प्राप्त करावे असे आवाहन बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष श्री. राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी केले. पाचशेच्यावर गरजु लोक या उपक्रमाचा दर गुरुवारी लाभ घेतात.

Related posts

ओ.बी.सी. आरक्षण मिळल्याशिवाय महाविकास आघाडीला स्वस्थ बसू देणार नाही – आ.ॲड आकाश फुंडकर

nirbhid swarajya

खामगाव राष्ट्रवादी तर्फे अब्दुल सत्ताराचा निषेध करत केले आंदोलन…

nirbhid swarajya

लॉकडाऊन मध्ये ही ते करतायेत गौ-सेवा

nirbhid swarajya
error: Content is protected !!