पुणे : श्रीमंत दगडूशेट हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुर्वर्णयुग तरूण मंडळातर्फे गणेश जयंतीनिमित्त मंदिरात ३ जून च्या पहाटे ब्रम्हाणस्पती सुक्त अभिषेक पार पडला त्यानंतर पहाटे ४ वाजता अभेद शैनक अभिषेकी, सत्यजित बेडेकर व रूद्रम वेदपाठक यांनी स्वराभिषेकातून गणरायाची स्वरसेवा अर्पण केली तसेच मंदिरात गणेश याग सहस्त्रावर्तने असा धार्मिक विधी देखील पार पडला. तसेच या मंडळाते गाभाऱ्यात मंदीरावर फुलांच्या माध्यमातून शेसनागाच्या प्रतीकृतीची आरास करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाच्या पातळीवर गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता त्यामुळे ही सजावट आजच्या दिवशी करण्यात आली.
जूनफुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान गणरायाचे विलोभनीय रुप शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने आज पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभा-यासह कळसावर शेषनागाच्या विविधरंगी भव्य फुलांच्या भव्य प्रतिकृती साकारुन सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता.
भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले.
श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्री शेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्री शेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. त्यामुळे ही सजावट मंदिरामध्ये करण्यात आली होती.