खामगांव : बुलडाणा जिल्ह्यात पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणाऱ्या पर्यावरण पूरक गणेशमुर्तींना पर्यावरण प्रेमींकडून चांगली मागणी असते. पण यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवावर देखील सावट आलेले दिसून येत आहे. पर्यावरण पूरक मूर्ति विक्रेत्यांनी कमी आणि लहान ऊंचीच्या मूर्ति विक्रीस आणल्या आहेत. खामगांव येथील गणेश मूर्ति विक्रेते गणेश वरणगांवकर हे पंधरा वर्षापासून पर्यावरण पूरक गणपती मुर्ती विक्रीचा व्यवसाय करतात, यावर्षी त्यांनी कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी पेक्षा या वर्षी पेण येथून गणपतीच्या कमी मोजक्याच व कमी ऊंचीच्या मूर्ती विक्री साठी आणल्या आहेत. दरवर्षी खामगांव मध्ये गणपती उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पर्यावरण पूरक म्हणून कागदी, टाकाऊ पासून टिकाऊ, असेच काही विविध प्रकारे गणपती बनविले जातात तर यामधे शाडु मातीच्या गणपतीला अधिक महत्व दिले जाते. सर्व ग्राहकांना गणेश मूर्ति ही सॅनेटाइज करुन, सरकारच्या सर्व नियमांचे पालन करुन विक्री करण्यात येत असल्याचे गणेश मूर्ती विकणारे गणेश वरणागावकर यांनी सांगितले आहे.