जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स व गुंजकर कॉलेजमध्ये शिवजयंती उत्साहात
खामगाव- गणेश उत्सवा प्रमाणे खरोखरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी व्हावी, असे प्रतिपादन गुंजकर एज्युकेशन हबचे संचालक प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर यांनी केले.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स व गुंजकर कॉलेज आवार येथे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजे होते. महाराज कुण्या धर्माच्या विरोधात नव्हते. त्यांनी अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम व मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यक्रमाला शाळेचे व कॉलेजचे शिक्षक प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
