खामगाव: सध्या प्रशासकीय यंत्रणेत बदल्यांचा हंगाम सुरु असून खामगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत यांची बदली झाली आहे.गटविकास अधिकारी राजपूत यांची मोताळा येथे बदली झाली असून या वृत्ताला बिडीओ राजपूत यांनी दुजोरा दिला आहे.अद्याप बदलीचे पत्र प्राप्त झाले नाही. मात्र आपली मोताळा येथे बदली झाल्याचे गटविकास अधिकारी राजपूत यांनी बोलतांना सांगितले.त्यांच्या जागी खामगाव पंचायत समिती नवीन गटविकास अधिकारी कोण येणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. लवकरच गटविकास अधिकारी राजपूत हे मोताळा येथे जाणार असून खामगावला नवीन गटविकास अधिकारी प्राप्त होणार आहेत.
previous post