November 20, 2025
जिल्हा

गजानन महाराज संस्थानतर्फे आयसोलेशनाठी ५०० खाटांची व्यवस्था

दररोज ५ हजार जणांना भोजनाच्या पाकिटांचे वाटप

शेगाव : बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थान लॉकडाउनच्या काळात जनसामान्यांच्या मदतीसाठी धावून आले आहे. सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या संस्थानने जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत ‘ कम्युनिटी किचन ‘ सुरु केले असून , मंदिराच्यावतीने शहरात दररोज २००० भोजन पाकिटांचे वितरण करण्यात येत आहेत तसेच पाचशे बेड आयोसोलेशनसाठी तयार ठेवले आहे. रुग्णांना,शहरात अडकून पडलेले मजुरांना,गरजू कुटुंबांना ही भोजनाची पाकिटे वाटली जात आहेत. याशिवाय गजानन महाराज संस्थानतर्फे आयसोलेशनाठी ५०० खाटांची व्यवस्था  करण्यात आली असून शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. सुमन चन्द्रा यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

संपूर्ण महाराष्ट्रात शिस्त सेवा विधायक कामात अग्रेसर असलेले शेगाव चे श्रीसंत गजानन महाराज संस्थान कोरोना वायरसच्या महामारीच्या राज्यावर आलेल्या आपत्ती काळात गरजवंताना दि २ मार्च २० पासून बूलढाणा येथे सकाळी १००० संध्याकाळी १००० शेगाव येथे १५०० पंढरपूर येथे सकाळ संध्याकाळ त्र्यंबकेश्वर येथे सकाळ संध्याकाळ ४०० असे भोजनाचे डबे सॅनेटराईज गाडीतून तेथील पोलिस ठाण्यात पाठविण्यात येतात येथून हे भोजनाचे डबे गोरगरिबांना व अडकून पडलेल्यांना सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वितरीत केल्या जात आहे. यात आता आपत्कालीन स्थिती आलीच तर त्यासाठी संस्थानाने ५०० बेड सर्व सुविधायुक्त तयार करून ठेवले आहे.

Related posts

गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत यांची मोताळा पंचायत समिती बदली…

nirbhid swarajya

महिला व बालविकास भवन कक्षाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

nirbhid swarajya

ज्‍येष्ठ गाैरींच्‍या देखाव्‍यातून डॉक्‍टरांबद्दल व्‍यक्‍त केली कृतज्ञता

nirbhid swarajya
error: Content is protected !!