टार्गेट पूर्ण न करणाऱ्याना दाखविला घरचा रस्ता
12 डिलेव्हरी बॉय झाले बेरोजगार
शेगांव : ग्राहकांकडून नगदीमध्ये रोख रक्कम न स्वीकारता त्यांच्याकडून ऑनलाइन खात्याद्वारे रक्कम स्वीकारावी असा तगादा लावून ऑनलाइन खात्याचे टार्गेट पूर्ण न करणाऱ्या ६ डिलिव्हरी बॉयला गॅस एजन्सी मालकाने घरचा धाक रस्ता दाखविल्याचा गंभीर प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात समोर आला आहे. यामुळे ६ डिलिव्हरी बॉय आणि त्यांचे ६ हेल्पर अशा १२ जणांच्या कुटुंबीयांवर बेरोजगाराची पाळी आली असून याविरोधात डिलिव्हरी बॉय एल्गार पुकारला आहे. या सिलेंडर डिलिव्हरी बॉय ला आपण ओळखला तर असालच कारण दर महिन्यासाठी आपल्याला लागणारे ते सिलेंडर घरपोच आणतात या पोटी त्यांना गॅस एजन्सी कडून तुटपुंजा मोबदला मिळतो. मात्र मागील १५ ते २५ वर्षापासून काम करणाऱ्या शेगावच्या डिलिव्हरी बॉय वर आज उपासमारीची पाळी आली आहे. ग्राहकांकडून सिलेंडरचे रोख रक्कम न स्वीकारता त्यांच्याकडून पेटीएम द्वारे रक्कम स्वीकारावी अशी अजब अट घालून एजन्सी मालकाने या डिलिव्हरी बॉय वर निर्बंध घातले असून ऑनलाइन खात्यांचे टार्गेट पूर्ण करणाऱ्या चे पगार दिल्या जाणार नसल्याचा इशारा मालकाकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे अनेक ग्राहकांकडे ऑनलाइन खाते नसल्याने आणि महिनाभर पैशांची जुळवाजुळव करीत असताना शेवटच्या दिवशी रोख रक्कम मिळत असल्याने टारगेट पूर्ण होत नाही म्हणून शेगावच्या सिद्धिविनायक गॅस एजन्सी वर काम करणाऱ्या सहा डिलिव्हरी बॉय आणि त्यांचे सहा हेल्पर त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. टार्गेट पूर्ण करीत असाल तर कामावर यावे अन्यथा येऊ नये असा इशारा गॅस एजन्सी मालकाने दिल्यानंतर डिलिव्हरी बॉय हे बेरोजगार झाले आहेत. गॅस कंपनीकडून प्रत्येक सिलेंडरवर २० रुपये पार्टींग चार्ज म्हणून डिलिव्हरी बॉय ला देण्यात येते मात्र शेगावात हि पूर्ण रक्कम एजन्सी मालक ठेवत असल्याचा आरोप होत आहे. फक्त २५०० रुपये पगार दिल्या जात असल्याचे डिलिव्हरी बॉयचे म्हणणे आहे. यासंदर्भात निर्भिड स्वराज्यने सिद्धिविनायक गॅस एजन्सी च्या चालकांची संपर्क साधले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.