शेगांव: काँग्रेसच्या भारत जोदो यात्रेदरम्यान विदर्भ दौऱ्यावर असलेल्या खासद राहुल गांधी यांनी शुक्रवारी साडेचार वाजता श्रींचे दर्शन घेतले. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेत्यांची उपस्थिती होती.खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भारत जोडो यात्रेचे शुक्रवारी सकाळी शेगाव येथे आगमन झाले.बाळापूर ते वरखेड फाट्यापर्यन्त पायी प्रवास केल्यानंतर खासदार राहुल गांधी यांनी वरखेड फाट्यावर काही वेळ विश्राम केला.त्यानंतर खासदार राहुल गांधी आणि काही काँग्रेस नेते वाहनाने दुपारी विदर्भ पंढरी असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरात पोहोचले.यावेळी श्री गजानन महाराज संस्थानकडून व्यवस्थापकीय विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांनी खा. गांधी यांचा यथोचित सत्कार केला.श्रींचे दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधी यांची जाहीर सभेच्या ठिकाणी रवाना झाले.
अकोला अमरावती खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर मोताळा राजकीय लोणार विदर्भ शेगांव शेतकरी संग्रामपूर सामाजिक सोलापुर