४ ठिकाणी धाडी ; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खामगांव : कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामध्ये सर्वत्र संचारबंदी असतांना बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव येथे अवैधरित्या सऱ्हास देशी-विदेशी दारु व बियरची चढ्या भावाने विक्री सुरु आहे तसेच यामध्ये काही डुप्लिकेट माल आल्याची माहिती मिळाली आहे. तर खामगांव विधानसभेचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे याबद्दल तक्रार केली होती व त्या तक्रारींमध्ये शहरात कोणकोणत्या जागी अवैध दारू विक्री केल्या जात आहे याचा उल्लेखही केला होता. सोबतच या तक्रारीच्या प्रतीलीपी सुध्दा त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी बुलडाणा, जिल्हा पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक यांना दिल्या होत्या. या तक्रारीमुळे जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली होती व पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग कामाला लागले होते.
याच पार्श्वभूमीवर आज दिनांक १८ एप्रिल रोजी खामगांव अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने खामगाव मध्ये मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन राबवले असता पथकाने तालुक्यात ४ ठिकाणी छापे टाकले यामध्ये शहरातील जुगनू हॉटेल जवळ सकाळच्या सुमारास श्याम गोकुल सावरकर, प्रभाकर खेडकर हे दोघे अवैध विदेशी दारुची वाहतूक करताना पोलिसांना मिळून आले. त्यांच्या कडून विदेशी दारु च्या २० शिष्या एकूण २६०० रूपयाचा माल जप्त केला आहे. शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत हॉटेल दशमेश समोर दुपारच्या सुमारास हरविंदरसिंग जसवंतसिंग पोपली, मंगेश तेलंग, किसन भगतपुरे अवैधरित्या विनापरवाना विदेशी दारूची विक्री करताना पोलिसांना मिळून आले त्यांच्याकडून दोन मोबाईल सह चार देशी दारूचे बंपर असा एकूण ८ हजार २० माल जप्त करण्यात आला, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. तिसऱ्या घटनेत टेंभुर्णा शिवरातील सुदर्शन ढाब्यावर गोपी उर्फ अजीतसिंह लक्ष्मणसिंह ठाकुर हा ढाब्यावर अवैध रित्या विनापरवाना बियर ची विक्री करताना पोलिसांना मिळून आला त्याचे कडून २७ बियर असा एकूण ४७४० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तर चौथ्या घटनेत कुऱ्हा शिवारात sdpo पथकाने छापा टाकुन रमेश संतोष कुऱ्हाडे हा शेतात अवैध रित्या हातभट्टीची दारू विक्री करताना मिळून आला असता त्याचे कडून १५ लिटर हा.भ. दारू व ८० लीटर मोह सड़वा व टिन डब्बे असा एकूण ११४७० रुपयाचा माल जप्त केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व कार्यवाया ASP हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत व अश्या कार्यवाया सुरू राहतील अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी निर्भिड स्वराज्य ला दिली आहे.
लॉकडाऊन च्या काळात खामगाव मध्ये अवैध दारूची विक्री चढ्या भावात सुरू आहे. निर्भिड स्वराज्य च्या सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार या अवैध दारूचे वाढलेले दर खालील प्रमाणे
१)देशी २००
२)मैकडॉल्स विस्की ३५०
३)रॉयल स्टैग ३५०
४)ऑफिशियल चॉइस ३५०
५)बिअर ३५०