October 6, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ

खामगाव सिलिंडरच्या ट्रकला धडक दिल्याने भरवस्तीत गॅस गळती…

खामगाव-नांदुरा रस्त्यावरील घटना: वाहतूक काहीकाळ ठप्प...

खामगाव : भरधाव अनियंत्रीत ट्रकने सुरुवातीला सायकलस्वार त्यानंतर दुभाजकावरील विद्युत खांब आणि गॅस सिलिंडरच्या ट्रकला धडक दिली. यावेळी गॅस गळती झाल्याने पोलिसांनी ट्रकला तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. यावेळी अनियंत्रित झालेला ट्रक खामगाव नांदुरा रस्त्यावरील एका हॉटेल समोर उलटला.यात ट्रकचालकासह एक जण जखमी झाला आहे.खामगाव येथून एमएच ४० एके ४४४७ क्रमांकाचा ट्रक नांदुराकडे राख घेऊन जात होता. दरम्यान, जलंब नाक्यासमोर या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने सुरुवातीला सुटाळा येथील राजू जानकीराम बगाडे या सायकलस्वारास धडक दिली.त्यानंतर खामगाव ते सुटाळा पर्यंतच्या रस्ता दुभाजकावरील विद्युत खांबांना धडक दिली. त्यानंतर एमएच ३७ टी ०२७१ या सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या एका बाजूला धडक देत, रस्त्यावर उलटला.या अपघातामुळे खामगाव-नांदुरा रस्त्यावर एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिस घटनास्थळी पोहोचले.क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी अपघातग्रस्त ट्रकमधील चालकाला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविले. ज्ञानेश्वर मुकिंदा अंमलकार (४२ रा. काळेगाव ता. खामगाव) असे जखमी चालकाचे नाव असून वाहक अवधेश प्रताप (३४ रा. उत्तर प्रदेश) किरकोळ जखमी झाला आहे.त्याच वेळी जखमी सायकलस्वाराला एका खासगी रुग्णालयात दाखल केली आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.सिलिंडरच्या ट्रकला सुरक्षित ठिकाणी हलविले.त्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचा दावाही सूत्रांकडून करण्यात आला. या घटनेमुळे खामगाव नांदुरा रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Related posts

भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात घृणास्पद लिखाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा

nirbhid swarajya

महिलांच्या सुरक्षेसाठी शहर पोलीस ॲक्शन मोडवर

nirbhid swarajya

शेतातील उभे असलेले पीक काढण्याबद्दल परवानगी देण्यात यावी आमदार – अँड.आकाश फुंडकर

nirbhid swarajya
error: Content is protected !!