January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा

खामगाव साठी 17 वेंटीलेटर दिल्याबददल पंतप्रधानांचे आभार- आ.फुंडकर

बुलढाणा जिल्हयासाठी ५८ व्हेंटिलेटर उपलब्ध

खामगांव : संपूर्ण देशात कोरोनाची परिस्थिती भयंकर असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलढाणा जिल्ह्या सारख्या मागास जिल्ह्याचा देखील विचार करावा ही एक महत्त्वाची बाब आहे. मागील कित्येक वर्षापासून असं पाहण्यात आलं की महाराष्ट्रातील राज्यकर्तेच विदर्भाच्या विकासात अडसर ठरत होते. परंतु मागील भाजपाच्या कार्यकाळात विदर्भावरील अन्याय दुर करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्या सारख्या छोट्या जिल्ह्याची दखल त्यातून खामगाव सारख्या छोटया शहराची दखल पंतप्रधान घेतात हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पी एम केअर फंडातून खामगाव सामान्य रुग्णालयसाठी १७ व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. त्याबददल खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.
पी एम केअर फंडातून आता १७ व्हेंटीलेटर्स उपलब्ध झाले असून या आधी आ. आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नातून पाच वेंटीलेटर उपलब्ध झालेले आहे. आता खामगाव सामान्य रुग्णालयाची व्हेंटिलेटरची संख्या 22 झाली आहे. यामुळे कोरणा सारख्या भयंकर परिस्थितीत रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी ही एक मोठी उपलब्धी होऊ शकेल. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.आकाश फुंडकर यांनी खामगाव सामान्य रुग्णालय हे कोरोना विरुध्द लढाईसाठी सुसज्ज करण्याचा ध्यास घेतला होता. त्याप्रमाणे त्यांनी पावले उचलत खामगाव येथे कोरोना तपासणी लॅब उभी केलेली आहे. लोकसहभागातून स्थापन झालेली ही देशातील पहिली कोरोना तपासणी लॅब आहे. यासोबतच आमदार आकाश फुंडकर यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून आधी रु.५० लक्ष व आता रु २० लक्ष निधी कोरणा टेस्टिंग लॅब मशीन व पी पी ई किटस़ व इतर आवश्यक साहित्य उपकरणासाठी मंजूजर झाले असून दुसरी कोरोना टेस्टींग लॅब मशीन लवकरच उपलब्ध होणार आहे. खामगावात कोरोना लॅब व व्हेंटींलेटरची कोरोना तपासणी व उपाय योजनांसाठी खूप मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यासाठी ५८ तर खामगावकरांसाठी १७ व्हेंटिलेटर पाठवल्या बद्दल त्यांचे शतशः आभार मानून तमाम खामगांवकर प्रशासनाने वेळोवेळी दिलेले आदेश, सुचनांचे काटेकोर पालन करुन कोरोना हया महामारीला मात देतील असेही आमदार आकाश फुंडकर म्हणाले.

Related posts

सोयाबीन , कपाशीवर उंट अळीचा प्रादुर्भाव वाढला कृषी सहाय्यक यांची पाहणी

nirbhid swarajya

कोरोनाशी लढत जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात संपन्न करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न -पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

nirbhid swarajya

शहरातील विवीध समस्या बाबत बसपाचे निवेदन

nirbhid swarajya
error: Content is protected !!