खामगांव : येथील खामगाव- शेगाव रोड वरील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भांडार केंद्र व 132 केव्ही सबस्टेशन ची संरक्षण भिंत रोडचे बांधकाम सुरू असताना पाडण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून खामगाव शेगाव रोडचे काम सुरू असताना रस्त्याची रुंदी वाढवण्यात येत होती त्यावेळेस ही भिंत रस्त्याच्या रुंदी वाढवताना ईगल कंपनीच्या खोदकाम करणाऱ्या मशीनने सदर भिंत पाडली होती.

मात्र तेव्हापासून आज पर्यंत ती भिंत पुन्हा उभारली नाही तर नुसतं त्याला डागडुजी करून जुने पत्रे कलर करून तिथे लावण्यात आले होते. या रस्त्याने दररोज वाहनांची वर्दळ असते रात्रीच्या वेळेस एखादया वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही तर वाहन 132 केव्ही स्टेशनच्या आत मध्ये जाऊन खूप मोठा अपघात होऊ शकतो. याकडे वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देऊन सदर भिंतीचे बांधकाम करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.