January 4, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

खामगाव-शेगाव रोडवर भीषण अपघात २ ठार; १ जखमी

खामगाव : शेगाव रोड वरील हॉटेल पुण्याई जवळ रात्री 9 च्या सुमारास दुचाकी व ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होऊन यामध्ये एक पुरुष व महिला जागेवर ठार झाले असून ८ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार चांदमारी भागात राहणारे विजय दत्तात्रय सारसकर वय ४०, पत्नी सुलोचना विजय सारसकर वय ३८ व त्याचा 8 वर्षाचा मुलगा सुपेश विजय सारसकर हे तिघे दुचाकीने शेगांव रोडवर सुरु असलेल्या आपल्या घराचे बांधकाम बघून घराकडे जात असताना शेगांव वरून भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स क्र.MH-30-AA-9995 ने दुचाकी क्र.MH-28-7868 ला जोरदार धड़क दिली.ही धड़क इतकी जोरदार होती कि ट्रॅव्हल्स ने दुचाकीला काही अंतरापर्यंत घासत नेले.या धडकेमध्ये दुचाकीस्वार विजय दत्तात्रय सारसकर यांचा जागेवरच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी सुलोचना विजय सारसकर यांचा दवाखान्यात नेताना वाटेतच मृत्यू झाला.तर त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी सदर ट्रॅव्हल्स व चालकाला ताब्यात घेतले असून ट्रॅव्हल्स पोलीसांनी पोलीस स्टेशन मधे लावली आहे.पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला असून त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. या अपघाताची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळतात त्यांचा भाऊ अविनाश सारसकर हे हिरा नगर स्थित आपल्या घरून त्यांना पाहण्यासाठी आपली पत्नी व दोन मुले यांना घेऊन जात असताना हनुमान व्हिटयामीन जवळ डुक्कर आडवे आल्याने गाडी स्लीप होऊन त्यांचा सुद्धा अपघात झाला. या अपघातात अविनाश दत्तात्रय सारसकर वय 40, धीरज अविनाश सारसकर वय 9, नक्ष अविनाश सारसकर वय 7 हे जखमी झाले आहेत. यातील नक्ष अविनाश सारसकर यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याला अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. बाकी जखमीवर खामगांव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच चांदमारी भागातील नागरिकानी सामान्य रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या सर्व घटनेने सारसकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच चांदमारी भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts

भंडारी येथील मुलगी विक्री प्रकरणाला वेगळे वळण

nirbhid swarajya

परनिल मुंढे या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणादायी उपक्रम,सुमारे 450 वृक्षरोपांचे वाटप….

nirbhid swarajya

जागतिक क्षयरोग दिन साजरा

nirbhid swarajya
error: Content is protected !!