शेगाव : खामगाव शेगाव पंचायत समिती कर्मचानी सहकारी पतसंस्थेची निवडणूक 11 डिसेंबर रोजी होणार आहे या निवडणुकीमध्ये बाराशे 42 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
खामगाव व शेगाव पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित निवडणूक मार्च 2020 मध्ये होणे अपेक्षित होते परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने निवडणूक लांबणीवर पडली होती परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून मतदार यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आलेली आहे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 7 नोव्हेंबर पासून सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर आहे15 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची तारीख 16 ते 30 नोव्हेंबर पर्यंत आहे 11 डिसेंबरला सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल घोषित होणार आहे .
previous post