खामगाव : कोरोनाच्या संसर्गात शहर पोलीस स्टेशन मधील १२ कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ७ जणांनी कोरोना वर मात केली आहे तर आता १ अधिकारी व ४ पोलिस कर्मचारी उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल झाले आहेत तर काही गृहविलगीकरणात आहेत. खामगाव शहर पोस्टेला कार्यरत असलेल्या या कोरोना योद्ध्यांचे लसीकरण ही झाले आहे. त्यामध्ये सध्या उपचार घेत असलेल्या अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तसेच आणखी ३ ते ४ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वँब दिले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या कामावर शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.