January 4, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई मेहकर राजकीय विदर्भ

खामगाव राष्ट्रवादी तर्फे अब्दुल सत्ताराचा निषेध करत केले आंदोलन…

खामगाव: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल शिंदे सरकार मधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द बोलल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस खामगाव शहरच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.सत्तार यांच्याविरोधात आंदोलनकर्त्यांनी सत्तार यांचा निषेध करत मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या.सत्तार यांच्या वक्तव्याने महिलांचा अपमान व अवमान झालेला आहे.अश्या अशोभनीय व असंस्कृत वक्तव्या बद्दल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी ही मागणी आंदोलन कर्त्यांनी केली. कारवाई करता खामगाव तहसीलदार मार्फत राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवेंद्र देशमुख,महिला आघाडी च्या शहराध्यक्ष सुधाताई भिसे,अंबादास पाटील,महेंद्र पाठक,विश्वनाथ झाडोकार,दिलीप पाटील,विजय कुकरेंज,रविंद्र आंधळे,जगन्नाथ देवकर,आकाश खरपाडे,मिर्झा अक्रम बेग,जयराम माळशिकारे,संतोष बोचरे,रामदास मोरखडे,भगवान लाहुडकर,आनंदराव देशमुख,यां च्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 402कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 70 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

दोन रूग्ण कोरोनावर मात करीत परतले स्वगृही…!

nirbhid swarajya

स्वाभिमानीचे राणा चंदन यांचे दुःखद निधन

nirbhid swarajya
error: Content is protected !!