खामगांव : सध्या संपूर्ण देश कोरोना महामारीशी झगडत आहे.अशातच देशामध्ये पेट्रोल,डीझल व गॅस च्या किमती बेसुमार वाढत आहे. पेट्रोल ने तर शंभरी पार करून टाकली आहे.आणि अशातच केंद्रातील भाजप सरकारने रासायनिक खतांच्या बेसुमार किमती वाढवून शेतकऱयांना मोठा झटका दिला आहे. केंद्र सरकारने रासायनिक खत १०:२६:२६ ची किंमत प्रति बॅग ६००/ रुपयांनी तर डी. ए. पी.ची किंमत प्रती बॅग ७१५/रुपयांनी वाढवली आहे.त्यामुळे कोरोनाच्या महामारीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप केंद्रातील भाजप सरकार ने केले आहे. केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करीत आहे. ही दरवाढ केंद्र सरकारने तातडीने रद्द करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल अशा आशयाचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खामगावच्या वतीने तहसीलदार यांच्या द्वारे मा.जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्रदादा देशमुख,मा.शहर अध्यक्ष नरेंद्र पुरोहित,महिला आघाडी शहर अध्यक्ष सौ.सुधाताई भिसे,विकास चव्हाण, रमाकांत गलांडे,महेंद्र पाठक युवक शहर अध्यक्ष आकाश खरपाडे,माधव पाटील,Ad.विरेंद्र झाडोकार, अजय धनोकार,विजय कुकरेजा, प्रशांत धोटे,आर्किटेक रंजित पाटील,अमोल बिचारे व खामगाव विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष दिलीप पाटील उपस्थित होते.