खामगाव : संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे या कालावधीत रोजगार आणि प्रवासासाठी बाहेर असलेले अनेकजण विविध ठिकाणी अडकलेले होते . अशांना पोलीस आणि प्रशासनाकडून स्थानबद्ध करण्यात आले होते. खामगांवात स्थानबद्ध करण्यात आलेल्या घाटपुरी रोडवरील शासकीय वसाहत गृहातील व
वसतीगृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान वसतीगृहातील महाराष्ट्रातील मजुरांना सोडण्याचे निर्देश राज्य शासनाकडून प्राप्त झाले त्यानंतर वसतीगृहात २१ पेक्षा जास्त दिवस असलेल्या ३४ जणांची खामगाव येथील वसतीगृहातुन स्वगृही रवानगी करण्यात आली आहे यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २७ तर यवतमाळ जिल्ह्यातील ९ जणांचा असा वसतिगृहामध्ये एकूण १०७ लोकांना क्वारंटाईन करण्यात करण्यात आले होते. दरम्यान परराज्यातील ७३ जनांबाबत अद्याप पर्यंत कोणतेही आदेश प्राप्त न झाल्याने त्यांना वसतीगृहात ठेवण्यात आले आहे.