मागण्या मान्य न झाल्यास ४ एप्रिल पासून जाणार बेमुदत संपावर
खामगाव:- तालुका महसुल कर्मचारी संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी घोषणा देऊन तहसील कार्यालय खामगाव येथे निदर्शने करत एकदिवसीय संप करण्यात आला.शासन स्तरावर मागील दोन वर्षे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने महसूल संघटनी एकदिवसीय संप केला आहे.राज्यातील महसूल विभाग, महसूल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असून
अतिरिक्त कारभार देण्यात येत आहे.महसूल सहाय्यक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. शासन निर्णय महसूल व वनविभाग दि.10 मे 2021 अन्वये नायब तहसिलदारसंवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.व त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांची सेवा जेष्ठता याद्या राज्य स्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढलेले आहे. परंतु अव्वल करून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याने सदर पत्र तात्काळ रद्द करावे तसेच इतर मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन मिळत असून त्यांची पूर्तता होत नसल्याने आंदोलन करण्यात येत असल्याचे खामगाव तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष पी. एस.पवार यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना सांगितले. तसेच ४ एप्रिलपासून बेमुदत संप करणार असल्याचेही सांगितले.यावेळी तालुका महसूल कर्मचारी संघटना उपाध्यक्ष व्ही.डी.लोखंडे,सचिव पी. एन. चोथे, कोषाध्यक्ष एम. पी. महातो, एन डी. चौधरी,एस.जे.चव्हाण,एन.डी. कस्तुरे यांच्या आदी कर्मचारी उपस्थित होते.