नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
खामगाव : कोरोनाच्या धास्तीमुळे सर्वच जण घरात बसलेले आहेत अशावेळी खामगाव शहरातील काही भागांमध्ये अज्ञात व्यक्तींकडून घरासमोर नवीन कपडे आणि पैसे टाकल्या जात असल्याने या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना ने संसर्ग करून पैसे आणि कपडे टाकल्या तर जात नाही ना ? अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे.
खामगाव शहरातील झुलेलाल नगर, सिद्धी कॉलोनी आणि परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे नवीन कपडे आणि पैसे टाकणारे व्यक्ती काही ठिकाणी सीसीटीवी मध्ये कैद झालेले आहेत. मात्र सदरील व्यक्ती हे अनोळखी असल्याने त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. मात्र दुसरीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनोळखी व्यक्तींकडून परिसरात कोरोना विषाणूची लागण लावून देण्यासाठी तर हा प्रकार केले जात नाही ना अशी शंका तेथील रहिवासी नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे अशी माहिती मुरली नेभवानी यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलतांना दिली आहे.
