January 4, 2025
बातम्या

खामगाव मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने सत्कार …


खामगाव माळी नगर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने समाजातील मान्यवरांचा व समाजातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.यावेळी आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी सभागृहकरिता जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल माळी नगर येथील एक कार्यक्रमामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची प्रतिमा देऊन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानून सत्कार करण्यात आला यावेळी समाजातील सर्व मान्यवर व मंडळातील कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार,सागर फुंडकर,सौ.अर्चना मसने,राजेंद्र धनोकार,सौ.ज्योती कलोरे,चंद्रशेखर चिंचोळकर,सौ. छाया पल्हाडे,सुधाकर पल्हाडे सौ.शारदा सोनटक्के,राजेश लोखंडे,जयंतराव मसने,सौ रुपाली काळे,यांच्यासह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सौ. सुरेखा धनोकार,सौ शारदा म्हसने,सौ नलिनी चिंचोळकर,सौ सुनंदा धनोकार,सौ वनश्री हुसे,सौ संगीता लोखंडे,सौ रेखा म्हसने,सौ जोती धनोकार,सौ उषा वाढोकार, सौ वैशाली पल्हाडे,सौ मालू धनोकार,सौ सुनीता घाटोळ,सौ सुरेखा धनोकार यांच्यासह आदी महिलांची उपस्थिती होती…

Related posts

अतुल पाटोळे उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन्मानीत

nirbhid swarajya

श्री जी वी मेहता नवयुग विद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना च्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस….

nirbhid swarajya

खामगाव ग्रामपंचायत मधील मतदार महिलांना “पैठणीचे आमिष” ईश्वरसिंग मोरे यांची तक्रार

nirbhid swarajya
error: Content is protected !!