खामगाव: शासकीय इमारतीवर दररोज झेंडा फडकवावा अशी संहिताआहे त्यानुसार खामगाव नगरपालिकेवर दररोज तिरंगा झेंडा फडकविला जातो व सायंकाळी सन्मानपूर्वक ते उतरविले जातो मात्र शुक्रवारी सायंकाळी सात वाजलेले असतानासुद्धा तिरंगा झेंडा फडकत फडकत असल्याची घटना घडली असून ह्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा प्रकार दिसून येत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव नगर पालिकेमध्ये दररोज राष्ट्रध्वजाला सलामी देऊन तिरंगा झेंडा फडकवला जातो यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून झेंडा फडकवणे आणि सायंकाळी सूर्यास्तापूर्वी विहित वेळेवर सन्मानपूर्वक उतरविणे यासाठी कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावलेले आहेत. यामध्ये दररोज झेंडा फडकवणे आणि सायंकाळी सन्मानपूर्वक उतरविणे हे कार्य नित्याचेच आहे हे मात्र आज शुक्रवारी सायंकाळचे सात वाजले असतानासुद्धा नगरपालिकेच्या इमारतीसमोर झेंडा फडकत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पाहता पाहता ही घटना संपूर्ण शहरात माहिती पडली. यामध्ये खामगावचे उपविभागीय अधिकारी चव्हाण यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कानावर हि बाब टाकली. व यानंतर सर्व सूत्रे हलवून झेंडा उतरविण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले त्यानंतर सदर कर्मचारी हा सायंकाळी 7 :30 च्या दरम्यान नगरपालिका इमारतीमध्ये पोहोचून त्यांनी झेंडा खाली उतरविला. विशेष म्हणजे झेंडा खाली उतरविण्याची पाधहत हि तिरंगा झेंड्याच्या अवमान करणारी होती. झेंडा उतरविता असतांना सादर कर्मचाऱ्याने झेंड्याला सलामी न देता या शिवाय राष्ट्रगीत न गाता झेंडा उतरविला यावर भरीस भर म्हणून झेंडा हात घेऊन सन्मानपूर्वक घडी न करता तो हातात घेऊन चालतात चालता घडी त्याने केली.आपल्याने चूक झाली आपण विसरलो होतो अशी गयावया त्याने नागरिकां समक्ष केली. प्रवीण नावाच्या या शिपायाने केलेल्या या प्रकाराला मुख्याधिकारी बोरीकर जबाबदार असलायचं सूर नागरिकांमध्ये होता.या प्रकरणी अद्याप पर्यंत कुणीही पोलिसात तक्रार केलेली नव्हती. मात्र ड्युटी असलेल्या शिपायाला तातडीने निलंबित केल्या जनार असलायची माहिती प्राप्त झाली आहे.
काय आहे ध्वज संहिता ? ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा. यावेळी सलामी देऊन राष्ट्रगीत होणे आवश्यक आहे. ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.