जीवितहानी नाही ; मोठ्या प्रमाणावर घराचे नुकसान
खामगाव : खामगाव तालुक्यातील वहाळा खुर्द येथे अचानक सिलेंडर चा स्फोट झाल्याने गावामध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
वहाळा खुर्द येथील शेतकरी विठ्ठ्ल वानखेडे यांच्या घरातील संध्याकाळी ६ च्या दरम्यान सिलेंडरची नळी लीक होऊन पेट घेतल्याने स्फोट झाला आहे. सिलेंडर ची नळी लीक झाल्याची बाब घरातील व्यक्तींच्या लक्षात येताच ते घराबाहेर आल्याने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र स्फोट मध्ये घरातील अन्य धान्य, साहित्य, घराची भिंत व टीन पत्रे उडाली असल्याने घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाऊस सुरू असल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळविण्यास मदत झाली. स्फोट च्या आवाजाने गावातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.