खामगाव: तालुक्यातील १६ ग्रामपंचायच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी आचारसंहिता लागू झाली असून दि.२० डिसेंबर २०२२ जी मतमोजणी होणार आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या,तसेच नव्याने स्थापित सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील.
नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २ डिसेंबर २०२२ दरम्यान दाखल करण्यात येतील.नामनिर्देशनपत्रांची छाननी 4 डिसेंबर रोजी तर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर ला दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व याच दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्हाचे वाटप होईल.मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.मतमोजणी २० डिसेंबर रोजी होईल.निवडणूकी साठी सर्व राजकीय पक्ष,नेते कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.