पिंपळगाव राजा :खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरा येथील मतीमंद मुलीवर १७ जुलै रोजी संध्याकाळच्या दरम्यान अत्याचार झाल्याची घटना पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्यात आली आहे.पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे.राजरोसपणे दिवसा ढवळ्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत.त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत उमरा गावामध्ये नुकतीच अत्याचाराची घटना समोर आली आहे. उमरा येथील २५ वर्षीय मतीमंद मुलीवर आरोपी संघपाल आनंदा सोनोने या ४० वर्षीय ईसमाने १६ जुलै रोजी सांयकाळच्या दरम्यान तीच्या असहायतेचा फायदा घेत त्या मतीमंद मुलीवर अत्याचार केला असून सदर आरोपी विरुद्ध पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश आडे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय हिवाळे,बीट जमादार शेख जावेद,पोलिस हेडकाँस्टेबल चव्हाण करीत आहेत.
previous post