खामगाव:माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खामगाव तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची सभा दि. 28 एप्रील वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता तहसील कार्यालय खामगांव येथे संपन्न झाली. या सभेमध्ये संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी दिव्यांग योजना, श्रावण बाळ योजना संबंधीचे अनेक अनुदान प्रकरणे मंजुर करण्यात आले.गोर-गरिब, वृध्द, निराधार, दिव्यांग, विधवा असाह्य अशा सर्वा सामान्य जनतेच्या हक्काचा आधारस्तंभ म्हणून सर्वदूर ख्याती असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खामगाव विधानसभा मतदार संघाचे लाडके नेते मा. आ. राणा दिलीपकुमारजी सानंदा साहेब यांचा 1 मे रोजी वाढदिवस येत असून त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने ही सभा घेण्यात आली. या सभेच्या सुरुवातीला संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुंटुंब योजना, इंदिरा गांधी दिव्यांग योजना, श्रावणबाळ योजना, अशा विविध प्रकरच्या अनुदान योजने संदर्भात लाभार्थ्यांना येणार्या अडचणीं दूर करण्या करीता चर्चा करण्यात आली त्यानंतर या सभेमध्ये संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी दिव्यांग योजना, श्रावणबाळ योजना अंतर्गत पूर्ण कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करुन प्राप्त झालेल्या अनेक प्रकरणांना अंतिम मंजुरात देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजना समितीचे खामगाव तालुका अध्यक्ष किशोर आप्पा भोसले हे होते. तसेच तहसीलदार अतुल पाटोळे साहेब, नायब तहसीलदार हेमंत पाटील साहेब, समितीचे सदस्य प्रीतम माळवंदे, अब्दुल आलीम अब्दुल फईम, शेख सलीम शेख फरीद, संतोष बोचरे, सौ.शारदाताई शर्मा, जयराम मुंडाले, जाधव मॅडम, तिवाने साहेब, लोखंडे साहेब आदींच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात आली.
previous post