खामगाव: तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, मंडळींची बाळासाहेबांची शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव साहेब यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले, निवेदनात खामगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा,सरसकट पंचनामे करण्यात यावे, पिक विमा मंजूर करण्यात यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले,यावेळी उपस्थित युवा सेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे,कदमापूर सरपंच पवन पवार, ज्ञानगंगापूर सरपंच ज्ञानेश्वर महाले कंझारा सरपंच शफी भाई, कंझारा ग्रामपंचायत सदस्य शंकर गव्हाळे, कारेगाव सरपंच गोवर्धन गव्हांदे ,शिक्षण समिती अध्यक्ष सुधाकर गव्हांदे,निळेगाव सरपंच प्रकाश हिवराळे, उपसरपंच शिवाजी शिसोदे पेडका पातोंडा सरपंच अनिल जाधव,विहिगाव रामनगर उपसरपंच अनंता पाटील त्रिकाळ, सदस्य कैलास कवडकार,महावीर जैन,बळीराम शामसुंदर आदींची स्वाक्षरीसह उपस्थिती होती,खासदार साहेबांनी दिवाळीमुळे पंचनामा उशीर झाला तरी आपण आता सर्वांची मिटींग लावून लवकरात लवकर पंचनामे करून घेण्याचे आदेश देऊ व व ज्यांनी पीक विम्याचे तक्रारी केल्या आहेत त्यांनी पंचनामे करून घ्यावे,आपण त्यांना पीक विम्याचे पैसे मिळण्याकरिता पाठपुरावा करून त्यांना पीकविमा मिळून देऊ असे आश्वासन देण्यात आले.