आमदार ॲड.आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश
केंद्रीय रेल्वे मंत्री पियुषजी गोयल व मा.केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे यांच्या कडील सततच्या पाठपुराव्याला यश
खामगांव : खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या विधानसभा निवडणुक वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगांव रेल्वेचा प्रश्ऩ मांडला होता व आज त्यांच्या मार्गदर्शनात खामगांव जालना रेल्वे मार्गाच्या अडचणींना दुर करण्यासाठी हया रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष फिल्ड़ सर्वेसाठी रेल्वे विभागाच्या तांत्रिक अधिका-यांची टिम आज खामगांवात दाखल होत आहे. लवकरच हया रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण होऊन हयातील सर्व तांत्रिक अडचणी दुर होऊन लवकरच हया रेल्वे मार्गाचे काम सुरु व्हावे अशी आशा निर्माण झाली आहे.खामगांव जालना हा रेल्वे मार्ग मागील अनेक दशकापासून प्रलंबीत आहे. मागील सरकारने केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम केले. परंतु काल पासून सुरु झालेल्या तांत्रीक सर्वेमुळे हा रेल्वे मार्ग होण्याबाबत मोठी आशा निर्माण झाली आहे. हया रेल्वे मार्गासाठी आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री मा. श्री पियुषजी गोयल व केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्ऩ व सार्वजनिक वितरण राज्य़ मंत्री रावसाहेबजी दानवे हयांच्याकडे सतत पाठपुरावा केला.तसेच हयाबाबत दिल्ली येथे झालेल्या भेटी दरम्यान देखील हयाबाबत चर्चा केली होती.गेल्या अधिवेशनात हयाबाबत आमदार ॲड. आकाश फुंडकर हयांनी हया रेल्वे मार्गाबाबत प्रश्ऩ देखील उपस्थित केला होता हे उल्लेखनीय आहे. केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्पात पूंजी निवेश कार्यक्रम अंतर्गत ३ हजार कोटी रुपये मंजुर केले आहे. हया सर्वेक्षणानंतर हया रेल्वे मार्गाबददल लवकरच निर्णय होऊन प्रत्यक्ष काम सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.२०१४ चे विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे मार्गासाठी आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे मध्य आणि दक्षीण रेल्वेला देखील याव्दारे जोडल्या जाऊ शकते. हयामुळे विकासापासून वंचीत राहिलेल्या विदर्भ मराठवाडयासाठी औद्योगिक विकासाची नवीन दारे खुली होणार आहेत.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हयांच्या मार्गदर्शनात देशात कोटयावधी रुपयांची विकास कामे सुरु आहेत. त्यांचे प्रत्येक बारीक सारीक कामांवर लक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर देशातील व राज्यातील जनतेला विश्वास असून येत्या काळात अनेक दशकापासून प्रलंबीत खामगांव जालना हा रेल्वे मार्ग नक्की पुर्ण होईल ही अपेक्षा व्यक्त होत आहे.