खामगाव: खामगाव ग्रामीण ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार ईश्वरसिंग मोरे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे केल्याने खळबळ उडाली.तक्रारीत नमूद आहे की,खामगाव ग्रामीण ग्रामपंचायत २०२२ च्या निवडणुकीत ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी याच भागातील शिरू ठाकरे (ठेकेदाराने) त्यांच्या वहिनी ज्योती ग. ठाकरे व त्यांचे पॅनल यांना विजयी करण्यासाठी अवैध मार्गाने मतदार महीलांना आमिष देत “हर घर पैठणी साडी” देत मतदानाची किंमत म्हणून संजीवनी कॉलनी , संजय नगर , मानवधर्म मागील संपूर्ण भाग , श्यामल नगर,हंसराज नगर यासह इतर बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणावर साड्यांचे वाटप रात्रीच्या अंधारात करण्यात आले आहे . खामगाव येथील मधुबन साडी सेंटर या दुकानाच्या नावाच्या पिशव्यांमध्ये ह्या पैठणी साड्या वितरित करण्यात आल्या आहेत.या निंदनीय प्रकरणाची तक्रार आपण निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने आपणामार्फत करण्यात यावी.सदर घटने विषयी चौकशी करून संबधित ठाकरे नामक ठेकेदाराच्या मोबाइल लोकेशन वरुन त्याने कोण कोणत्या भागात या पैठणी साड्यांचे वाटप केले याची शहानिशा होऊन संबधितावर योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी तक्रारदार ईश्वरसिंग मोरे यांच्या कडून होत आहे.