खामगाव– सहकार क्षेत्रातील निवडणुका पक्षीय जोड़े बाहेर काढून लढविल्या जातात, हे खरे असले तरी एकाच आघाडीतील दोन वेगवेगळे पॅनल असणे ही बाब आघाडीला नक्कीच मारक आहे.असाच काहीसा प्रकार खामगाव कृउबास निवडणुकीत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते नाना व राणा यांच्या नेतृत्वातील दोन पॅनलच्या उमेदवारांनी नामांकण अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे कार्यकर्ते व मतदार संभ्रमात पडले असून सदर बाब विरोधी पक्षाच्या पथ्यावर पडणार यात तीळ मात्र शंका नाही.
जिल्ह्यातील खामगावसह १० कृउबास च्या निवडणुका महाविकास आघाडी च्या वतीने लढविण्याचा निर्णय चिखली येथे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री तथा आ.डॉ राजेंद्र शिंगणे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे व शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी एका बैठकित घेतला. परंतु खामगाव कृउबास निवडणुकी साठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोन वेगवेगळ्या चुल मांडल्याने महाविकास आघाडीचे नेमके खरे पॅनल कोणाचे ?असा प्रश्न निर्माण होत आहे.कृउबास निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जाणार नसली तरी महाविकास आघाडीतील फुट कोणाच्या पथ्यावर पडणार हे सांगण्यास ज्योतिषाची गरज नाही.
कृउबास निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे,अशोक हटकर,गणेश माने,श्रीराम खेलदार यांची उपस्थिती होती.तर दुसरी कडे काँग्रेस नेते ज्ञानेश्वर (नाना) पाटील, तेजेंद्रसिंह चौहान, राष्ट्रवादीचे देवेंद्र देशमुख,रावसाहेब पाटील,अंबादास पाटील,पुंजाजी टिकार, शिवसेना ठाकरे गटाचे रवि महाले,विजय बोदडे यांची बैठक पार पडली. दोन्ही बाजूने १८ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२३ असून यानंतरच खरे काय ते चित्र स्पष्ट होईल पण सध्या तरी महाविकास आघाडीच्या तूर्त बिघाडीची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
वंचितची सावध भूमिका
माजी आ. सानंदा यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला वंचितचे नेते अशोकभाऊ सोनोने व जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी उपस्थित राहणार असल्याचा प्रचार केला होता.या मेळाव्याला दोघेही उपस्थित नव्हते.परंतु यामुळे अचानक जागे होऊन वंचित बहुजन आघाडी ने खामगाव विश्राम भवन येथे मेळावा व पत्रकार परिषद घेतली.या मेळाव्यात व पत्रकार परिषदेत पक्ष निरीक्षक प्रभाकर वानखडे यांनी कृउबास निवडणूक स्वबळावर लढविण्याचे पक्षश्रेष्ठींचे आदेश असल्याचे सांगितले तर कोणाकडून सन्मानपूर्वक प्रस्ताव आल्यास युती करण्याची तयारी असल्याचे सुतोवाचही केले आहे.तर वंचितची स्वबळीची तयारी असताना केवळ ५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. यावरून वंचितने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहूल बोन्द्रे अनभिज्ञ महाविकास आघाडीतील बिघाडीबाबत निर्भिड स्वराज्य च्या प्रतिनिधीने काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना विचारणा केली असता नाना यांनी नेतृत्वातील पॅनलबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले व याबाबत माहिती घेऊन नंतरच प्रतिक्रिया देईल असे म्हणाले.