खामगाव: आगामी सणासुदीच्या अनुषंगाने खामगाव उपविभागातील आठ सराईत गुन्हेगारांना बुलढाणा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले. खामगाव शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वाधिक तिघेजण हद्दपार करण्यात आलेत.खामगाव उपविभागातंर्गत येत असलेल्या पोलीस स्टेशनतंर्गत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाºयांना मागील वर्षभरात तडीपार, मोक्का, स्थानबद्ध आदी स्वरूपाच्या कारवाई करण्यात आल्या आहेत. यामुळे शहरातील हाणामारी-तोडफोडीच्या घटनांना काही प्रमाणात अटकाव घालण्यात पोलिसांना यश आले आहे.प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्यात येत गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यास मदत होणार असल्याचा पोलीसांचा दावा आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अपर पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनात संबधितांविरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केले. सतत पाठपुरावा केल्यानंतर आठ जणांना जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे
तडीपार केलेले सराईत गुन्हेगार
सागर सिध्दार्थ शेजोळे,बाळापूर फैल,सागर मनोहर तायडे, शंकर नगर,शेख इसरार उर्फ काल्या शे.रफिक, जुना फैल
विशाल उर्फ धम्मा देवनारायण यादव,सतीफैल,विष्णु लक्ष्मण लव्हारे,सजनपुरी,आकाश रघुनाथ बुडुखले,सुदामा नगर,शेगाव,सागर भीमराव सोनोने, वरूड ता.शेगाव,प्रदीप लुलाजी मोरे,रा.जलंब