December 14, 2025
बातम्या

खामगाव -अकोला महामार्ग वर भीषण अपघात

खामगांव : खामगाव वरून बाळापूर येथे लग्नाला जात असताना रिट्स कारला ट्रक ने जोरदार दिली धडक दिली असून यामध्ये खामगाव मधील पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुना फैल भागात राहणारे मोहम्मद अमर मोहम्मद जावेद, मो सिद्दक मो आसेश, शेख मुजम्मिल शेख मुस्ताक, शेख मोहसीन शेख रस्तार, हे जुना फैल भागात राहणाऱ्या अब्दुल वहाब यांच्या घरी असलेल्या लग्नासाठी वरती म्हणून बाळापूरला जात असताना कोलोरी फाट्याजवळ ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये कार मध्ये असणारे पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. अपघात घडल्याची माहिती मिळाल्यानंतर खामगावातील सामाजिक कार्यकर्ते तथा मुस्लिम फ्रंट चे नेते गुलजम्मा शहा यांनी तात्काळ याठिकाणी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केले व दहा हजाराची मदत सुद्धा केली.सोबतच एम आय एम चे शहराध्यक्ष मोहम्मद आरिफ यांनी सुद्धा घटनास्थळावर पोहोचून जखमींना तात्काळ मदत दिली.

Related posts

प्रिंपि देशमुख येथे पार पडला रजिस्टर मॅरेज

nirbhid swarajya

मद्यधुंद ट्रक चालकाची दुचाकीला धडक; २ जण जखमी

nirbhid swarajya

माय लाईफ स्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रा.लि.च्या माध्यमातून सर्वसामान्यांचा दुबई दौरा….

nirbhid swarajya
error: Content is protected !!