April 18, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा

खामगावात डि,बी पथकाची मोठी कारवा ईचोरी प्रकरणातील चार आरोपीसह मुद्देमाल जप्त…

४८ तासात लावला प्रकरणाचा छडा…

खामगाव :एका महिलीची पर्स हिसकावून चोरट्यांनी धुम ठोकली होती.पर्समधून चोरट्यांनी १५००० हजाराच मोबाईल लंपास केला होता.तशी तक्रारही सदर महिलेने २६ मे २०२२ रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली होती.दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३९२.४११.३४ भा.द.वी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना खबऱ्याकडून मिळणाऱ्या माहितीवरुन आरोपीतचा शोध घेतला असता तिन अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतले होते.त्यातील एका चोरट्याने सदर चोरीतील मोबाईल फोन हा खामगाव हरी फैलातील एका इसमास ३५००/रुपयास विकला होता.त्यास ताब्यात घेऊन पोलीसांनी एकुण चार आरोपीसह मोबाईल फोन ४८ तासात यशस्वी छडा लाऊन जप्त करण्यात आला आहे.त्यामुळे ब-याच चोरीच्या घटणांचा छडा लागण्याची शक्यता आहे।ही कारवाई पोलिस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी मार्गदर्शनात तपासी अधिकारी पो.ना. राज फासे,अफसर तडवी पोकाॅ.गुरुदेव यांनी केली आहे

Related posts

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारू दुकानांमध्ये झडती सत्र

nirbhid swarajya

किरीट सोमय्यांच्या फोटोला जोडे ! प्रतिमा पायदळी तुडविली;ठाकरे गट आक्रमक

nirbhid swarajya

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त उद्या वंदेमातरमच्या वतीने भजन संध्या कार्यक्रम…

nirbhid swarajya
error: Content is protected !!