January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा विदर्भ

खामगावात जनता कर्फ्यू १०० % यशस्वी.. आ.आकाश फुंडकर यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद

खामगांव : खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी काल खामगावकरांना तीन दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत खामगावकरांनी आपली दुकाने, प्रतिष्ठाणे बदं ठेवून जनता कर्फ्यू यशस्वी केला आहे.
खामगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून शासन मोठ्या प्रमाणात तपासणी आवश्यक असतानाही जिल्हा प्रशासन हलगर्जीपणा करत मागील एक महिन्यापासून स्वॅब टेस्टिंग मशीन घेण्यास टाळाटाळ करीत आहे, त्यामुळे जवळपास दीडशेच्या आसपास नमुने खराब होऊन रुग्णांचे रिपोर्ट वेळवर येऊ न शकल्यामुळे कोरोंटाईन व्यक्तींना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसापासून खामगांव शहरात व जिल्हयात मोठया प्रमाणात रुग्णांची वाढत आहे. या सोबतच आरोग्य विभाग, पोलीस विभाग, नगरपरिषद प्रशासन हे मागील तीन महिन्यापासून कोरोना विरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. परंतु मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता ह्या सर्वांवर प्रचंड ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी तीन दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आव्हान केले.


खामगाव मतदारसंघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी जनतेच्या सुरक्षेचा ध्यास घेतला असून मागील तीन महिन्यापासून त्यांच्या मार्गदर्शनात खामगांव शहर व मतदार संघात आवश्यक पाऊले उचलण्यात येऊन आता पर्यंत शहर व मतदार संघ सुरक्षीत ठेवण्यात यश आले. परंतु मोठया प्रमाणात रुग्णांचे स्वॅबचे तपासणी प्रलंबीत झाल्यामुळे व स्वॅब नमुने खराब झाल्यामुळे कोरोंटाईन व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ति मुक्तसंचार केल्यामुळे मोठया प्रमाणात रुग्ण संख्या वाढत होती. त्यामुळेच आ. फुंडकरांनी तीन दिवसाचा जनता कर्फ्यू चे आवाहन केले व त्यांच्या आवाहनाला साद देत संपुर्ण खामगांव शहर बंद ठेऊन त्यात व्यापारी, इतर व्यावसायिक व सेवा देणारे प्रतिष्ठाणे यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले सर्व प्रतिष्ठाने व व्यवसाय बंद ठेवले आहे. त्यामुळे आज संपूर्ण खामगाव शहरात कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात आल्याचे दृश्य दिसत आहे. जनतेने येत्या काही दिवस घराबाहेर पडू नये अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. सोबतच १० वर्षाखालील लहान मुल व ६० वर्षावरील माता भगीने जेष्ठ नागरीक यांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन व विनंती खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केले आहे

Related posts

गो.से.महाविद्यालयाचे रासेयो शिबिर संपन्न…

nirbhid swarajya

घरकुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महा आवास अभियान

nirbhid swarajya

कोरोनाचा धसका: गर्दी टाळण्यासाठी २० वर्हाडी समोर लावले लग्न

nirbhid swarajya
error: Content is protected !!