खामगाव : खामगाव शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. आज शहरामध्ये चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यातील ३ रुग्ण हे फाटकपुरा तर एक रुग्ण हा सतीफैल् भागातील असून तो व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव आल्याने खामगाव शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्या मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला खामगाव मधील लोकप्रतिनिधी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते, सोबतच काही पत्रकार सुद्धा या अंतयात्रेला उपस्थित होते. एकीकडे खामगाव शहराच्या बाजूला असलेले मलकापूर शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालले असून मलकापूर मध्ये जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे तर एकीकडे खामगाव मध्ये सुद्धा दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने खामगावात सुद्धा जनता कर्फ्यू लावण्यात यावा अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. खामगाव शहरात एकूण 21 कोरोना बाधित रुग्ण असून तालुक्यामध्ये 4 असे एकूण 25 कोरोना बाधित रुग्ण आहेत.अंतयात्रेमधे जे लोक सहभागी होते अश्या लोकांना प्रशासनातर्फे कॉरंटाइन करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्यांचे स्वॅब घेऊन लॅब ला पाठवण्यात येणार आहेत.अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी दिली आहे.
previous post