माजी गृहमंत्री अनिल देशमुख मनीलाँडरींग प्रकरणात चौकशीचा फेरा
खामगाव येथील तत्कालीन डीवायएसपी आणि सध्या अकोला येथे जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत असलेले जी .श्रीधर यांना सक्त वसुली संचालनालयाने ( ई.डी. ) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी समन्स देण्यात आला आहे . माजी गृहमंत्री हे मनी लाँडरिंग प्रकरणात चांगलेच अडकलेले असून या प्रकरणाची चांदीवाल आयोगासमोर चौकशी सुरू आहे.
या संपूर्ण चौकशीत जी .श्रीधर यांचे नाव समोर आल्याची प्राथमिक माहिती असून त्यामुळेच त्यांना ईडीने समन्स दिला आहे येत्या १७ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे . या चौकशीनंतरच या प्रकरणात जी . श्रीधर यांचा काय व कसा संबंध आहे हे स्पष्ट होईल दरम्यान याची सध्या जिल्हा पोलिस वर्तुळात चर्चा होत आहे .