खामगाव: राज्यात ‘स्क्रब टायफस’ या दुर्मिळ आजाराने शिरकाव केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात तब्बल नऊ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे.
‘स्क्रब टायफस’ हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. या आजाराचे अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया आणि रशिया देशात हे रुग्ण आढळतात. भारतात हिमाचल प्रदेशात हे रुग्ण आढळतात.सध्या खामगांवमध्ये सहा, शेगावात दोन,जळगाव जामोद एक रुग्ण आढळून आला आहे.खामगाव तालुक्यातील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.
खामगाव किती रुग्ण….
‘स्क्रब टायफस ‘अत्यंत दुर्मिळ असा आजार असून या आजाराचे रुग्ण अफगाणिस्तान , पाकिस्तान,जपान,इंडोनेशिया आणि रशिया या देशात आढळत होते मात्र आता बुलढाणा जिल्ह्यात एक दोन नव्हे तर तब्बल नऊ रुग्ण आढळले आहेत त्यात एकट्या खामगाव तालुक्यात १० रुग्ण आढळून आले यात घाटपुरी , वरना,जयपूर लांडे,निपणा,पेडका पतोंडा चा समावेश असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अभिलाष खंडारे यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलतांना सांगितले आहे
स्क्रब टायफस म्हणजे काय ?
‘स्क्रब टायफस’ हा आजार अत्यंत दुर्मिळ असा आहे.उंदीर किंवा जंगलातील दाट गवतावरील एका प्रकारचा कीटक चावल्यावर यातील “ओरिएंशिया सुसूगामुशी” नावाचा जीवाणू आपल्या शरीरात गेल्यावर हा आजार होतो.
या आजारामुळे मृत्यू होणाऱ्याचे प्रमाण तीस टक्के आहे. हा जीवाणू शरीरात गेल्यावर जवळपास ८ ते १० दिवसांनी ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षण दिसून येतात.अनेकदा मेंदूत ताप गेल्याने रुग्ण बेशुद्ध होऊन मरण पावतात. त्यामुळे हा आजार पसरू नये यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. या आजारावर उपचार शासकीय रुग्णालयात केले जातात.या रोगापासून वाचवण्यासाठी कपडे आणि अंथरूणावर परमेथ्रिन आणि बेंझिल बेंझोलेट शिंपडावे. ‘स्क्रब टायफस’ या रोगावर कोणतीही लस उपलब्ध नाही.केवळ संक्रमित व्यक्तीपासून दूर राहणे, हा एकमेव बचावाचा मार्ग आहे. त्यामुळे या रोगाचे संक्रमण झाल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे.तसेच हिरवाड मध्ये विशेषतः शेतात काम करणाऱ्यांनी काळजी पूर्वक काम करावे , ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन खामगाव येथील डॉक्टरांनी केले आहे