खामगांव : जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या १६ बोलेरो जीप आणि १९ दुचाकी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दाखल झाल्या होत्या. यासाठी जिल्हा नियोजन समितीने १ कोटी २५ लाख २५ हजार रुपयांचा निधी दिला होता. गुढीपाडव्याच्या सकाळी पोलीस मैदानावर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते या नव्या वाहनांचे पूजन करण्यात आले होते. यावेळी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच चारचाकी वाहनांचे पासिंग करण्यात आले आहे . त्यानुसार वाहने विविध पोलीस ठाण्यांना वितरित करण्यात आली आहे.त्या वाहनातील एक वातानुकूलित बोलेरो गाड़ी खामगांव शहर पोलीस स्टेशन मधे आज सकाळी दाखल झाली असून शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या हस्ते गाडीची पुजा करण्यात आली. यावेळी पीएसआय रणजीतसिंग ठाकूर,अमरसिंग ठाकुर, प्रफ्फुल टेकाडे, अशोक खवले,श्रीधर काळे, अरूण हेलोडे, संतोष वाघ ,दीपक राठोड, संजय धंदर,मोहन करूटले, सतीश चोपड़े उपस्थित होते.लवकरच पोलीस विभागाची दुचाकी सुद्धा खामगांव शहर पोलिसांना मिळणार आहे.