November 20, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई

खामगांव शहर पोलिसांची ७ हजार वाहनधारकांवर कारवाई!

लॉकडाऊन मधे कारवाया करण्यात खामगांव शहर पोलीस स्टेशन ठरले जिल्ह्यात अव्वल

खामगाव : कोरोना काळामध्ये कायदे व सुव्यवस्था भंग करणारे व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या विरुद्ध बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कारवाया खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत झाल्या आहेत. कडक निर्बंध कालावधीत सतर्कता आणि कारवाईत तत्परता दाखवित खामगाव शहर पोलिसांनी ०१ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत तब्बल ७००० पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करीत १५ लक्ष रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याच वेळी पालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईद्वारे विनामास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या कारवाईच्या माध्यमातून २ लक्ष ६० हजारांचा दंड वसूल केला आहे. १५ फेब्रुवारी पासून कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढीस लागला होता. शहरासह ग्रामीण भागात महिन्याभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत होती. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, काही प्रमाणात दिलासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कडक निर्बंध कालावधीत विनामास्क फिरणाऱ्या ७३७ जणांवर तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या ४८ जणांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. पालिका पथकाच्या मदतीने साधारणपणे ५ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १५ लक्ष रुपयांचा दंड शासकीय तिजोरीत जमा केला आहे. बुलडाणा जिल्ह्यात ७०७७ हजार मोटार वाहन कायद्याच्या सर्वाधिक कारवाया खामगाव शहर पोलिसांनी केल्या आहेत. यामध्ये ट्रिपल सीट प्रवास, लायसन्स न बाळगणे, सोशल डिस्टन्स ठेवून प्रवास न करणे, यासह विविध प्रकारचा दंड ठोठावला आहे.२६३ गुन्हे दाखल कडक निर्बंध कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर व्यावसायिक दुकाने उघडणाऱ्या २६६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सलून, कापड, झेरॉक्स, वाहने आणि इतर प्रकारच्या दुकानांचा समावेश आहे. या सर्व दुकानदारांविरोधात भादंवि कलम १८८, २६९, २७०, आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१(ब), तसेच  साथ रोग अधिनियम ०३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. कडक संचारबंदी काळातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस प्रशासनाने सुरुवातीपासूनच लक्ष्य केंद्रित केले. या कालावधीत मोटार वाहन कायद्यानुसार ७०७७ कारवाई करीत १५ लक्ष रुपयांचा दंड वसूल केला आहे. अशी माहिती खामगाव शहर पोलीस निरिक्षक सुनील अंबुलकर यांनी दिली आहे.

Related posts

जळगाव जामोद महावितरणचा भोगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर….

nirbhid swarajya

आ.ॲड.आकाश फुंडकर यांनी केली रेल्वे क्राँसींगवर उडडाण पुलाचे बांधकामाचा पाहणी

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 163 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 42 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!