शहर आपले सौंदर्य गमावणार तर नाही न….
खामगांव : महाराष्ट्रासह जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा वाढत आहे. त्याच अनुशंगाने राज्य सरकारने सर्व सण, जयंती,व इतर कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यास सांगितले आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यात विविध जयंत्या साजऱ्या करण्यात आल्या. त्यानिमित्त खामगांव शहरातील नव्याने सुरु झालेल्या स्ट्रीट लाइटच्या पोल वर झेंडे लावण्याची स्पर्धा सुरु झाली. आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने व लहान- मोठे झेंडे पोल वर लावण्याची सुरुवात केली. शहरातील अकोला रोड ते नांदुरा रोड तर शेगांव रोड वर मोठ्या प्रमाणात झेंडे लावलेले आहेत. काही चौकाच्या ठिकाणी तर १५-२० फुटांचे झेंडे लावले आहेत. काही दिवसांपुर्वी य्या वरून वाद सुद्धा झाले होते मात्र सदर वाद थोडक्यात निपटला होता. या सर्व गोष्टीकडे नगर पालिका प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे.
एरवी अनधिकृत बॅनर शहरात लागले की, नगरपालिका त्यांच्यावर तात्काळ करवाई करते मात्र स्ट्रीट लाइट वर लागलेले झेंडे दिसत नाहीत. हे सर्व झेंडे पाहून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष विचलीत होऊन अपघात सुद्धा होऊ शकतात. सूत्राने दिलेल्या महितीनुसार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आकोटकर यांना पत्र सुद्धा दिले आहे. सदर पत्रात असे नमुद आहे की शहरात विनपरवानगी लावलेल्या झेंड्यामुळे जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाली तर याला जबाबदार नगर पालिका प्रशासन राहील. तरी लवकरात लवकर स्ट्रीट लाइट वर लावलेले झेंडे काढण्यात यावे अन्यथा याला नगर पालिका प्रशासन जबाबदार धरण्यात येईल. मात्र एकीकडे नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून आपल्या शहराचे सौंदर्य खराब होणार नाही याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. आता शहर पोलीस स्टेशन कडून दिलेल्या पत्रानंतर नगरपालिका प्रशासन कुठला निर्णय घेते हे पहावे लागेल.