November 20, 2025
बातम्या

खामगांव वामन नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे फाटकाचे ठिकाणी भुयारी मार्गास मंजूरात आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश.


रविवार दि.04 जून 2023 रोजी भुयारी मार्गाचे पुणे येथे एकत्रीतरित्या केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन.

खामगांव- शहरातील पोलीस स्टेशन पासून राष्ट्रीय महामार्ग क्र 6 ते खेल का मैदान, वामन नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वेचे फाटक क्र.6 येथे केंद्रीय मंत्री मा.ना.श्री नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनात भुयारी मार्गास मंजूरात देण्यात आली आहे.खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नातून खामगांव शहरातील वामन नगर, समन्वय़ नगर, समता कॉलनी, हरी फैल, जिया कॉलनी शिक्षक कॉलनी, ताज नगर या भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शासकीय विश्राम गृहा नजीक खामगांव जलंब रेल्वे मार्गावर रेल्वे फाटक क्र.06 आहे.

हे रेल्वे फाटक दिवसभरातून अनेकवेळा बंद असते त्यामुळे या परिसरातील नागरीकांना अनेक वेळा फाटक बंद असल्यामुळे अडकून रहावे लागते. त्यांची कामे खोळंबतात. खामगांव येथे आठवडयातून अनेक वेळा मालगाडी येत असते त्यावेळी सदरची फाटक हे तासंतास बंद असते. त्यामुळे खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाशदादा फुंडकर यांनी याबाबत मा.ना. नितीनजी गडकरी केंद्रीय भुपृष्ठ़ परिवहन मंत्री, तसेच मा. ना.रावसाहेब दानवे पाटील साहेब यांच्याकडे सदरची मागणी लावून धरली या प्रयत्नांना यश येऊन सेतू बंधन योजनेंतर्गत या रेल्वे फाटकाऐवजी भुयारी मार्ग मंजूर करण्यात आला असून सदर कामासाठी रु.75 कोटी 12 लाख रुपए मंजूर करण्यात आला आहे.या भुयारी मार्गामुळे खामगांव शहरात येणाऱ्या उपरोक्त़ परिसरातील नागरीकांना सोयीचे होणार आहे. या भुयारी मार्गाचे दि.04 जून 2023 रोजी केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग, मंत्री यांचे शुभ हस्ते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दु.04.00वा पुणे येथे थाटात संपन्ऩ होणार आहे. या परिसरातील नागरीकांकडून आमदार ॲड.आकाशदादा फुंडकर यांचे आभार व्यक्त़ करण्यात येत आहेत.

Related posts

जनतेचा आग्रह असल्यास लोकसभा लढवणार – संदीप शेळके

nirbhid swarajya

भाजप महिला आघाडी अध्यक्षा चित्राताई वाघ यांच खामगावात जल्लोषात स्वागत…

nirbhid swarajya

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तयारीला लागा-पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

nirbhid swarajya
error: Content is protected !!