खामगाव : येथील प्रभाग क्रमांक १३ मध्ये राहणाऱ्या रहिवासी लोकांनी सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असल्याने त्या ठिकाणी नवीन शौचालय बांधण्यात यावे याकरीता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस ने दिलेल्या या निवेदनामध्ये असे नमुद आहे की, खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील सार्वजनिक शौचालये ३० ते ३५ वर्षे जुनी असल्याने या शौचालयाची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहेत. तसेच या ठिकाणी घाणीचे साम्राज्य सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले असून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. या परिसरात राहणारे रहिवासी हे मध्यम वर्गीय असल्याने त्यांच्या छोट्या घरांमध्ये जागेअभावी शौचालयाची व्यवस्था होणे कठीण आहे, त्यामुळे सद्यस्थितीत असलेले जुने शौचालय पाडून त्या ठिकाणी नवीन सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात यावी. किंवा या भागातिल ज्या कुटुंबियाकडे शौचालय नाहीत त्यांना आपल्या घरासमोर शौचालय बांधकामाची परवानगी मिळावी तसेच शासनाच्या योजनेअंतर्गत शौचालय बांधकामासाठी अनुदान मिळावे या सोबत अशा विविध समस्यांचे निवेदन आज स्थानिक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मार्फत नगरपरिषद चे मुख्याधिकारी आकोटकर यांना दिले. सदर निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र देशमुख, विकास चव्हाण, महेंद्र पाठक, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आकाश खरपाडे, कुणाल काटकर, ओम शेटे, विनीत भुसारे आदींची उपस्थिती होती.
previous post