सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर संग्राम चौगुले यांची प्रमुख उपस्थिती
खामगांव : धकाधकीच्या जीवनात सर्वांनीच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे त्यासाठीच सहज साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी जिमची संकल्पना सुरू झाली आणि ती खामगांवमधे रूजली. खामगांवमधे उदयापासून सुरु होणाऱ्या या जीमचा फायदा नक्कीच खामगांवकराना होईल.धकाधकीचे जीवन सुरु असताना तरूण, तरूणी, महिला व पुरुष यांनी सर्वाना स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागते.आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर आपण रुग्णालयाची पायरी चढतो. त्यावेळी अख्खे कुटुंब हतबल होते. त्यासाठी घरातील सोने आपल्याला प्रसंगी गहान ठेवावे लागते; त्यामुळे आरोग्य चांगले व्हावे यासाठी व्यायामाची गरज आहे.अशा वेळी त्यांना फावल्या वेळात व्यायाम करता यावा यासाठी घुले परिवाराकडून नांदुरा रोड वरील पंचायत समिती समोरील घुले प्लाझा येथे उद्या ऑल बॉडी फिटनेस येथील सुप्रसिद्ध डॉ.वामनराव घुले यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच या उद्घाटनाला प्रसिद्ध बॉडीबिल्डर मि.यूनिवर्स तथा मि.वर्ल्ड संग्राम चौगुले याची विशेष उपस्थिती राहणार आहे. कोरोना नंतर प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी लागली आहे. अशातच खामगाव शहरातील तरुण, तरुणी, महिला, पुरुष यांचे आरोग्य सुदृढ राहावे या दृष्टिकोनातून घुले परिवाराने अत्याधुनिक अश्या प्रशस्त यंत्रणा सामुग्रीसह असलेल्या जिमची निर्मिती केली आहे. याशिवाय या इमारतीमध्ये पुणेरी चहा या प्रतिष्ठानाच्या सुद्धा शुभारंभ होणार आहे त्याकरिता घुले परिवाराकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.