November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

खामगांव मधील प्राध्यापकाची लाखोने फसवणूक करणारे दोघेही अटक

खामगांव : येथील सुराणा एक्सलन्स हबचे संचालक प्रा.आनंद सुराणा यांची लाखोने फसवणूक झाल्याची खामगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकारणी खामगांव शहर पोलिसांनी दोन्ही आरोपीला वेगवेगळ्या राज्यातून अटक केली आहे. याबाबत सविस्तर असे की, सुराणा एक्सलन्स हब कोचींग क्लासेसचे सन २०२० मध्ये कोव्हीड -१९ सुरु झाल्यामुळे शिकवणी वर्ग हे शासनाचे आदेशानुसार बंद करण्यात आले होते. त्यामुळे मुलाचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणुन शासनाचे निर्देशानुसार ऑनलाइन क्लासेस करिता मुलांना मोबाइल प्रोवाइड करावयाचे होते. त्यानुसार त्यांच्या कोचिंग क्लासेस वर शिकवण्याचे काम आशुतोष सिंग करित होता. त्यांचा मित्र कमी भावात मोबाइल देतो असे सांगून आशुतोष सिंग याने प्रा.आनंद सुराणा यांना सांगितले.

सर्व बोलनी झाल्यावर सांगितल्या प्रमाणे सुभेदु राय सुमन कुमार राय यांच्या अकाऊंटला पैसे टाकले. आरोपीकडे सुभेदु राय सुमन कुमार राय याच्या कडे सुराणा यांचे १२ लाख ९० हजार रुपये जमा असताना सुभेदु राय सुमन कुमार राय याला मोबाइल पाठविण्यास सांगीतले असता त्याने अनेक कारणे देवुन उडवाउडवीचे उत्तरे दीली. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच प्रा.आनंद सुराणा यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. या तक्रारिच्या आधारे शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सूनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि रणजितसिंह ठाकुर यांनी आपली तपास चक्र फिरवत आरोपीचा शोध घेऊन १२ जून रोजी उत्तर प्रदेश येथून आशुतोष सिंग याला अटक केली होती तर काल मध्यरात्री दरम्यान दूसरा आरोपी सुभेदूराय सुमनकुमार राय वय २६ रा. शिवपूर्व वाराणसी याला गोवा येथील कंडोलिम येथून त्यास अटक करण्यात आले आहे. सदरची कारवाई पीएसआय रणजितसिंग ठाकूर, नापोका सचिन बावणे पो कॉ संदीप टेकाळे यांनी केली आहे.

Related posts

अवैध वाळु उपस्यावर नियंत्रणासाठी ग्रामदक्षता समिती

nirbhid swarajya

मानाच्या नऊ पालख्यांना पायदळ वरीला परवानगी द्यावी

nirbhid swarajya

चक्क ज्ञानगंगा नदीपात्रातील भूखंडावर केले अतिक्रमण

nirbhid swarajya
error: Content is protected !!