April 4, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई शिक्षण

खामगांव मधील प्राध्यापकाची १३ लाखाने फसवणूक

खामगांव : येथील सुराणा एक्सलन्स हबचे संचालक प्राध्यापक आनंद सुराणा यांची लाखोने फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्राध्यापक आनंद सुराणा यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फ़िर्यादित असे सांगितले आहे की, सुराणा एक्सीलन्स हब कोचींग क्लासेस खामगाव शहरात राजनकर हॉस्पीटलच्या तळमजल्यावर आहे. सन २०२० मध्ये कोव्हीड -१९ सुरु झाल्यामुळे शिकवणी वर्ग हे शासनाचे आदेशानुसार बंद करण्यात आले आहेत. म्हणुन मुलाचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणुन शासनाचे निर्देशानुसार ऑनलाइन क्लासेस करिता मुलांना मोबाइल प्रोवाइड करावयाचे होते. आशुतोष सिंग हा कोचिंग क्लासेस वर मुलांना मागील तीन वर्षापासुन शिकवण्याचे काम करित होता. आशुतोष सिंग याने प्रा.आनंद सुराणा यांना म्हटले की, सुभेदु राय सुमन कुमार राय याचा मोबाइलचा फार मोठा बिझनेस आहे तो माझ्या ओळखीचा असून माझा चांगला मित्र आहे. आपल्याला कंपनी रेटमध्ये मोबाइल देइल असे म्हटल्याने सुभेदु राय सुमन कुमार राय यांच्या सोबत बोलनी करुन या दोघांवर विश्वास ठेवुन सुराणा यांनी HDFC बैंक खाते क्रे. 50203021079643 मधुन दि.२-३-२०२० रोजी सुभेदु राय सुमन कुमार राय याचे Yes बँक खाते

क्रं.094363300001312 मध्ये १९ लाख २० हजार रुपयाचा भरणा केलेला होता. त्यामधुन आरोपीने सुरुवातीला ७ मोबाइल, त्यानंतर ३० ते ४० मोबाइल पाठवले. तर कधी ५० मोबाइल पाठवले. आणि कधी ७०-८० असे मोबाइल पाठविले. आरोपी याने काही मोबाइल दीले असुन आरोपीकडे सुभेदु राय सुमन कुमार राय याच्या कडे सुराणा यांचे १२ लाख ९० हजार रुपये जमा असताना सुभेदु राय सुमन कुमार राय याला मोबाइल पाठविण्यास सांगीतले असता त्याने मोबाइल तर पाठविलेच नाही उलट सध्या मोबाइलचा माल नाही तर कधी ट्रान्सपोटेशन बंद आहे असे अनेक कारणे देवुन उडवाउडवीचे उत्तरे दीली. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येतात सुराणा एक्सलन्स हब चे संचालक प्राध्यापक आनंद सुराणा यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. यामध्ये दोन्ही आरोपींनी संगनमत करुन आनंद सुराणा यांची १२ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. प्राध्यापक आनंद सुराणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी आशुतोष सिंग, सुभेदु राय सुमन कुमार राय या आरोपींविरुद्ध ५१५/२०२१ कलम ४२०,३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सूनील अंबुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि रणजीतसिंह ठाकुर हे करत आहे.

Related posts

जिल्ह्यातील लॉक डाऊन नियमात बदल

nirbhid swarajya

दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत. “पद्मश्री” पोस्टाने पाठवा साहेब !

nirbhid swarajya

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठली – चंद्रशेखर बावनकुळे

nirbhid swarajya
error: Content is protected !!