खामगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ही साखळी तोडण्यासाठी 21 ऑगस्ट पर्यत लॉकडावुन राहणार असल्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जाहिर केले आहे. तसेच महिन्यातील शनिवारी व रविवारी दोन दिवस १०० टक्के बंद राहणार आहे. आज खामगाव शहरासह जिल्ह्यात प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बंद पाळला पर्यंत सकाळी ९ ते दुपारी तीन वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवा व दुकाने वगळता, दुपारी तीन नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत अत्यंत कठोर संचारबंदी राहणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे . त्याअनुषंगाने खामगाव शहरासह जिल्हयात दुपारी कडक लॉकडाउन दिसुन येत आहे. पूर्ण संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या 21 जुलै पासून प्रत्येक शनिवार आणि रविवार या दोन दिवशी कर्फ्यू राहणार आहे.या पहिल्या आज शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी तथा भाजीविक्रेते असो यांनी सकाळपासूनच आपली प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेवली आहे.