January 4, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ शेतकरी

खामगांवात सीसीआय चे तीन खरेदी केंद्र सुरु

आ.ॲड आकाश फुंडकर यांच्या हस्ते शुभारंभ

खामगांव : खामगांव मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते दि.२८ नोव्हेंबर २०२० रोजी भारतीय कपास निगम (सीसीआय) च्या खरेदी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये कमल इंडस्ट्रीज,भारत ॲग्रो इंडस्ट्रीज व जानकी जिनिंग या तीन केंद्रांचा समावेश आहे.केंद्र सरकारने शेतकऱ्यांला कोठेही माल विक्रीस नवीन कायदयाव्दारे हक्क दिला आहे.परंतु खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीव्दारा हया कापूस खरेदी केंद्रावर केवळ खामगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येण्याची जाहीर करण्यात आले आहे. ही अट अन्याय कारक असून केंद्र शासनाच्या नवीन शेतकरी विषयक कायदयाचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने ही जाचक अट तात्काळ रद्द करुन सर्व कापूस खरेदी केंद्रावर राज्य भरातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी खामगांव ‍विधानसभा मतदार संघाचे आ.ॲड आकाश फुंडकर यांनी केले आहे.काल दि. २८ नोव्हेंबर रोजी खामगांव विधान सभा मतदार संघाचे आ.ॲड आकाश फुंडकर यांचे शुभ हस्ते हया भारतीय कपास निगम (सीसीआय) च्या कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ.ॲड आकाश फुंडकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचे पूजन करण्यात आले,त्यानंतर कापूस घेऊन आलेल्या श्री विनोद वासुदेव खंडारे,हिवरखेड, श्री.विजय मार्तंडराव इंगळे हया शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मागील अनेक वर्षापासून भारतीय कपास निगम (सीसीआय) व्दारा कापूस खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मिळणारा योग्य हमी भाव व वेळेवर मिळणारी कापूस खरेदीची रक्कम हयामुळे भारतीय कपास निगम (सीसीआय) बाबत शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे.सद्या भारतीय कपास निगम (सी सी आय) च्या कापूस खरेदी केंद्रावर केवळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याचीच सुविधा उपलब्ध आहे.यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री.गजाननराव देशमुख, कृ उ बा स चे माजी संचालक श्री.विठ्ठल लोखंडकार, प्रमोद अग्रवाल, प्रफुल अग्रवाल, अनिल गुप्ता, विजय शर्मा, हे उद्योजक, सीसीआय चे केंद्र प्रमुख श्री.भरणे, केंद्र प्रमुख खामगाव बी श्री.देशमुख, बाजार समिती चे सचिव भिसे,उमेश ढोण, रामकृष्ण भारसाकळे अंत्रज, संजय दाभाडे तांदुळवाडी यांच्यासह आदि शेतकरी बांधव उपस्थित होते.

कोणत्याही जिल्हयातील शेतकऱ्यांना भारतीय कपास निगम (सीसीआय) च्या सर्व खरेदी केद्रावर कापूस विकण्यास परवानगी द्यावी – आ.फुंडकर
शेतक-यांनी भारतीय कपास निगम (सी सी आय) व्दारा खामगांव येथे सुरु केलेले कमल इंडस्ट्रीज, भारत ॲग्रो, व जानकी जिनींग हया तीन केंद्रावरच आपला कापूस द्यावा. शासनाव्दारे कापूस हया कापूस खरेदी केंद्रावर रु ५७७५/- हया दराने कापसू खरेदीस सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आपल्या कापसाचा चांगला दर मिळण्यासाठी सीसीआय च्या खरेदी केंद्रावरच कापूस आणावा असे आवाहन खामगांव विधानसभा मतदार संघाचे आ.ॲड आकाश फुंडकर यांनी केले आहे.खामगांव हे पुर्वीपासून कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे.जिनिगची कापसावर प्रक्रिया करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे सदरची कापूस खरेदी ही केवळ तालुक्यापुर्ती मर्यादीत केल्यास हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणारे आहे.केंद्र सरकारच्या शेतकरी विषय नवीन कायदयानुसार शेतकऱ्यांना आपला माल कोठेही विकण्याचा हक्क आहे.परंतु खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने सीसीआयच्या खरेदी केंद्रावर केवळ तालुक्यातीलच शेतकऱ्यांना कापूस विकण्याची अट टाकल्यामुळे हे शेतकऱ्यांचा हक्क हिरावून घेणारे असून शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे सदरची अट तात्काळ रदद करण्यात यावी व सदरचे कापूस खरेदी केंद्र सर्व शेतकऱ्यांसाठी मोकळे करण्यात यावे अशी मागणी आ.ॲड आकाश फुंडकर यांनी केले आहे.

Related posts

विदर्भस्तरीय दीपावली साहित्य काव्यमहोत्सव संपन्न

nirbhid swarajya

लॉकडाऊन मधे दिव्यांगांना मिळत आहे सक्षम आधार

nirbhid swarajya

अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा…!

nirbhid swarajya
error: Content is protected !!