लाखों रूपयांवर मारला चोरांनी डल्ला
खामगाव : शहरातील नांदुरा रोडवरील दोन मेडिकल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ लाखाची रोकड लंपास केल्याची घटना पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली़ आहे. मिळालेल्या माहितीनुसार नांदुरा रोडवरील तुळजाई हॉस्पिटल मधील डॉ.गौरव टिकार व देवेंद्र मालू यांच्या तुळजाई मेडिकलच्या शटरचे कुलुपाचा कोंडा कटरच्या साह्याने कापून दुकानातील सुमारे ८० हजाराची रोकड लंपास केली़ आहे. सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे. सदर सीसीटीव्ही मधे दिसले की, चोर हे नांदुरा रोडकडून एका पांढया रंगाच्या तवेरा गाडीने आले होते. अंदाजे ४-५ संख्येत असलेल्या चोरट्यांजवळ एका थैलीत अवजारे व शस्त्रे होती़. घटनेदरम्यान हाँस्पीटल मध्ये झोपलेल्या कर्मचायांना आवाज सुध्दा आला नाही.
तर दुसया घटनेत जलंब नाका भागातील एका हॉस्पिटल मधील मेडिकल दुकानाच्या शटरचे कुलुप कटरने कापले व दुकानातून सुमारे २ लाख ५० हजाराची रोकड लंपास केली. सदर घटना सुध्दा सीसीटीव्ही मधे कैद झाली आहे़. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी एकाच टोळीने चोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़. याप्रकरणी खामगांव शहर पोलीस स्टेशन मधे तक्रार देण्यात आली आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. नांदुरा रोड वरील पथदिवे दररोज रात्री १२ वाजेनंतर बंद राहत असल्याने चोरांना आयतीच संधी मिळाली होती.
तसेच अंधारामुळे सीसीटीव्ही मधे कैद तवेरा गाडीची नंबर प्लेट दिसू शकत नाही़. नांदुरा रोडवर बहुतांश बँका व व्यापारी प्रतिष्ठाने असल्याने परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नगर परिषद आर्थिक बचत करण्यासाठी रात्री पथदिवे बंद करीत आहे, तर दुसरीकडे काही भागात दिवसा सुध्दा पथदिवे सुरू राहतात़. एकंदरीत नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभाराचा मात्र नागरिकांना भुर्दंड सोसावा लागत आहे. यामुळेच चोरट्यांना रान मोकळे झाल्याचा आरोप नागरिकांमधे होत आहे़.