कोरोना सेंटर घाटपुरी येथे स्वच्छता व इतर आवश्यक़ सुविधा पुरविण्याचे दिले निर्देश
होम कोरोन्टाईन असलेल्यांवर पण शासन ठेवणार करडी नजर
खामगांव : संपुर्ण महाराष्ट्रासह खामगांव तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतांना दिसत आहे. आज खामगांव शहरात १४७ कोरोना पॉझेटीव्ह़ रुग्ण् आढळले आहेत. दिवसेदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी सामान्य़ रुग्णालय खामगांव येथे आढावा बैठक घेतली. यामध्ये प्रामुख्याने शहरालगत असलेल्या घाटपुरी येथील कोव्हीड सेंटर येथील स्वच्छता व इतर बाबींवर चर्चा करुन स्वच्छता पाळण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच जे नागरीक होम आयसोलेशन मध्ये आहेत ते बाहेर फिरत असल्याबाबत अनेक नागरीकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते अशा परिस्थितीत परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी अशा रुग्णांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.परिस्थितीचे गांर्भीय नागरीकांनी लक्षात घ्यावे कारण सामान्य रुग्णालय खामगांव येथे ६२, कोव्हीड सेंटर घाटपुरी येथे २००, शेगांव येथे ५०, बाहेरगांवी उपचारार्थ गेलेले ५० तर होम कोरोंन्टाईन १५० रुग्ण आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्य़क आहे. यावेळी नागरीकांनी मास्क़चा वापर, सॅनिटायझरचा वापर,नियमीत हात स्वच्छ़ धुणे, सुरक्षीत अंतर ठेवणे, कामाशिवाय घराबाहेर पडू नये या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन खामगांव विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केले आहे. या बैठकीस उपविभागीय अधिकार जाधव, निवासी वैद्यकीय अधिक्षक निलेश टापरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दिनकर खिरोडकर, न प उपमुख्याधिकारी सुर्यवंशी, रुग्ण़ कल्याण समिती सदस्य़ संजय शिनगारे, राम मिश्रा यांची उपस्थिती होती.