खामगांव: महाराष्ट्रामधे गुटखा बंदी लागु असताना सुद्धा शहरामधे मोठ्या प्रमाणात गुटख्याची सर्रास विक्री सुरु आहे, तसेच महाराष्ट्र राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचा जिल्हा असून सुद्धा जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री सुरुच आहे.अशातच शिवाजी नगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खामगांव मधील बर्डे प्लॉट भागातील एका घरातील खोलीमधे अवैध गुटखा साठवून ठेवल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती,त्याच गुप्त माहितीच्या आधारे सकाळी 8 च्या सुमारास बर्डे प्लॉट मधील शेख अफसर यांच्या घरावर छापा मारला असता यावेळी महाराष्ट्रामधे बंदी असलेला गुटखा पोतडयामध्ये मिळून आला. गुटख्याची किंमत अंदाजे 1 लाख 19 हजार रुपयाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी पोलिसांनी गुटखा व शेख अफसर याला ताब्यात घेतले आहे.पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासनाकडे प्रकरण वर्ग केले आहे, लॉकडाऊनच्या काळात अवैध गुटखा विक्री जोमात सुरु असल्याने या कडे राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
previous post